Join official fan page on   &   

हिंदुस्थानातील तमाम नागरीकांना विनम्र आवाहन !

23.9.10

दि. २४ सप्टेंबर २०१० रोजी अयोध्या प्रकरणी मा. न्यायालयाकडून निकाल दिला जाणार आहे. साहजिकच हिंदू मुस्लिम धर्मियांपैकी कोणातरी एका धर्माला हा निकाल योग्य वाटणार आहे. आपसुकच दुस-या पार्टीला त्यामुळे नाराजी वाटणार आहे. आपल्या देशात न्यायव्यवस्थेला अत्यंत आदराचे आणि सन्मानाचे स्थान आहे.
मा. न्यायालयाकडून या प्रकरणी निर्णय कोणताही लागो तो दोन्ही धर्मियांनी संयमाने व शांततेने स्विकारला पाहीजे. आपणास निर्णय अमान्य असल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये सनदशीर मार्गाने त्याबाबत दाद मागण्याचा भारतीय लोकशाहीने अग्रहक्क प्रदान केलेला आहे. मात्र धर्मांध हो‌ऊन देशाला हानी पोहचेल असे कोणतेही कृत्य हिंदुस्थानी जनतेने करु नये. यातच दोन्ही धर्मीयांचे हित सामावलेले आहे.
आपला देश विकसित हो‌ऊ पहातोय. जगातील एक उदयन्मुख महासत्ता म्हणून संपूर्ण जग आपल्याकडे पाहत आहे. त्या प्रगतीला खिळ बसेल असे कृपया कोणतेही कृत्य दोन्ही धर्माकडून होणार नाही याची धार्मिक, राजकीय व सामाजिक नेतृत्वांकडून खबरदारी घ्यायला हवी.
आपला हिंदुस्थान महासत्ता बनू नये यासाठी आपल्या आजूबाजूच्या अनेक देशांचे प्रयत्न सुरु आहेत. अतिरेकी संघटना जातिय तणाव भडकेल अशा संधीची नेहमी वाट पहातात. जाणून बुजून धार्मिक दंगली घडवून आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांना पोषक हो‌ईल अशी कोणतीही संधी हिंदुस्थानचा स्वाभिमान असणारा कोणताही नागरीक ये‌ऊ देणार नाही अशी आशा वाटते. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे सर्व धर्मियांनी ध्यानात ठेवून वागावे. असे आवाहन जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, दक्षिणपीठ - नाणीजधाम येथून प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

0 प्रतिक्रिया:

Post a Comment