Join official fan page on   &   

प.पू. सत्यसाईबाबा म्हणजे एक समाजरत्त्‍न..!

23.4.11

प.पू. सत्यसाईबाबा म्हणजे एक समाजरत्‍न होते. ते निखळून पडल्यामूळे समाजाचा एक मसिहा हरविला आहे. तळागाळातील आणी उपेक्षित समाजासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. या सामाजिक कार्याबरोबर त्यांनी आध्यात्मातून अखंड विश्‍वाला बंधूभाव आणी शांतीचा संदेश दिलेला आहे. या प्रसंगी आम्हास वाटते शांतीचा दुत आपल्यातून निघून गेला आहे.

Read more...

हिंदुस्थानातील तमाम नागरीकांना विनम्र आवाहन !

23.9.10

दि. २४ सप्टेंबर २०१० रोजी अयोध्या प्रकरणी मा. न्यायालयाकडून निकाल दिला जाणार आहे. साहजिकच हिंदू मुस्लिम धर्मियांपैकी कोणातरी एका धर्माला हा निकाल योग्य वाटणार आहे. आपसुकच दुस-या पार्टीला त्यामुळे नाराजी वाटणार आहे. आपल्या देशात न्यायव्यवस्थेला अत्यंत आदराचे आणि सन्मानाचे स्थान आहे.
मा. न्यायालयाकडून या प्रकरणी निर्णय कोणताही लागो तो दोन्ही धर्मियांनी संयमाने व शांततेने स्विकारला पाहीजे. आपणास निर्णय अमान्य असल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये सनदशीर मार्गाने त्याबाबत दाद मागण्याचा भारतीय लोकशाहीने अग्रहक्क प्रदान केलेला आहे. मात्र धर्मांध हो‌ऊन देशाला हानी पोहचेल असे कोणतेही कृत्य हिंदुस्थानी जनतेने करु नये. यातच दोन्ही धर्मीयांचे हित सामावलेले आहे.
आपला देश विकसित हो‌ऊ पहातोय. जगातील एक उदयन्मुख महासत्ता म्हणून संपूर्ण जग आपल्याकडे पाहत आहे. त्या प्रगतीला खिळ बसेल असे कृपया कोणतेही कृत्य दोन्ही धर्माकडून होणार नाही याची धार्मिक, राजकीय व सामाजिक नेतृत्वांकडून खबरदारी घ्यायला हवी.
आपला हिंदुस्थान महासत्ता बनू नये यासाठी आपल्या आजूबाजूच्या अनेक देशांचे प्रयत्न सुरु आहेत. अतिरेकी संघटना जातिय तणाव भडकेल अशा संधीची नेहमी वाट पहातात. जाणून बुजून धार्मिक दंगली घडवून आणण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांना पोषक हो‌ईल अशी कोणतीही संधी हिंदुस्थानचा स्वाभिमान असणारा कोणताही नागरीक ये‌ऊ देणार नाही अशी आशा वाटते. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे सर्व धर्मियांनी ध्यानात ठेवून वागावे. असे आवाहन जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, दक्षिणपीठ - नाणीजधाम येथून प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Read more...

शांततेचे आवाहन !

27.5.10

सर्व हिंदू धर्मियांना आवाहन करण्यात येते की, सध्या काही वृत्तवाहिन्यांनी जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांची बदनामी करण्याचे सत्र सुरु केले आहे. या पध्दतीने जगदगुरुंच्या धर्मकार्य, समाजकार्य व अध्यात्मिक कार्याला खीळ बसवण्याचा प्रयत्न चालू आहे. या संदर्भात योग्य ती कायदेशीर उपाययोजना करण्यात येत आहे.
तरी हिंदूधर्मियांनी व भक्तगणांनी या बातम्यांनी विचलीत न होता, शांतता पाळण्याचे आवाहन जगदगुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम तर्फे करण्यात येत आहे.

Read more...

आग्रहाचे निमंत्रण

11.5.10

माझ्या प्रिय भक्त शिष्य आणि साधकांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात येते की, नाणीजधाम येथे आमच्या उपास्य दैवताचे मंदिर निर्माण कार्य पुर्ण झाले आहे. त्या मंदिराचा कलशारोहण आणि श्रींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्टा तुमच्या प्रत्यक्ष उपस्थितीत करावयाची आहे. आम्ही या कामात व्यस्थ असल्यामूळे आपल्याशी प्रत्यक्ष बोलता आले नाही. त्यामुळे हे आग्रहाचे निमंत्रण समजून १८ मे ते २६ मे या कालावधीत नाणीजधाम मध्ये सह कुटुंब सहपरीवार यावे. आम्ही आपली वाट पाहत आहे.

Read more...

हिंदू धर्म पुनर्प्रवेश आम्ही का देतो ?

2.1.10

संपूर्ण विश्वात सनातन वैदिक संस्कृती फारच जुनी आहे. जगाच्या पाठीवर या संस्कृतीचे हिंदू लोक अनेक देशांमध्ये वास्तव्य करून होते. त्याचे असंख्य पुरावे आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात. विश्वव्यापक ही हिंदू संस्कृती काळाच्या पडद्या‌आड गडप होत होत आता केवळ नाममात्र भारत देशात औषधासारखी शिल्लक उरली आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. या हिंदू संस्कृतीच्यानंतर अनेक वर्षांनी उदयास आलेल्या अनेक संस्कृत्या (धर्म) आज विश्वव्यापी होत चाललेले आहेत. जगामध्ये मुस्लीम, इसा‌ई इ. सारखे धर्म जगातील प्रत्येक देशात आपले स्वत:चे अस्तित्व निर्माण करू लागले आहेत.... नव्हे तर संपूर्ण देशच त्यांच्या मालकीचाच झाल्यासारखे चित्र आज अनेक देशात आहे. दोन्ही संस्कृत्यांना प्रचंड तहान लागली आहे.... अन्य संस्कृत्यांना पि‌ऊन जगात केवळ एकमेव आपल्याच धर्मियांचे वर्चस्व असावे.... या स्पर्धेतून हिंदू धर्म गिळंकृत होतो की काय ? अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. हा माझा देश आहे असा एकही देश या पृथ्वीच्या पाठीवर हिंदू धर्मियांना अग्रहक्काने सांगण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही.
भारतामध्ये थोडेफार हिंदू धर्मियांचे ऐकून घेतले जावू शकते अशी अल्प प्रमाणात परिस्थिती आहे. यास्तव भारतातील हिंदूंनी अस्तित्वाची लढा‌ई लढण्यासाठी जागृत होणे आवश्यक आहे. या धर्माला राजाश्रय नसल्याने मुस्लीम आणि ईसा‌ई लोक भारत देशामध्येही हिंदूधर्मियांचे धर्मांतर करून लचके तोडत आहेत. भारतामध्ये अनेक राज्यात हिंदू अल्पसंख्यांक आहे. या देशातील उर्वरीत राज्यांमध्ये मुस्लीमांचे जेहादी लव आणि ख्रिश्चनांचे धर्मांतर हिंदू धर्मियांच्या अस्तित्वाला प्रचंड धक्का पोहचवित आहेत. यापूर्वी बंदुकीच्या धाकावर आणि तलवारीच्या टोकावर मुसलमानांनी आणि ख्रिश्चनांनी या देशातील हिंदूना बाटवलेले आहेच, ते कदाचित त्यांच्या दृष्टीने कमी काम झाले असावे. याकरिता राजाश्रयाच्या जोरावर खुले‌आम मुस्लीम जेहादी लव मार्फत हिंदू मुलींना मुसलमान बनवित आहेत, तर ख्रिश्चन हिंदूंच्या गरीबीचा आणि अज्ञानाचा फायदा घेवून बाप्तीस्मे करत आहेत.
खरे तर या देशात समान नागरीकायदा आवश्यक आहे, हे केवळ धर्मगुरू म्हणून आमचे मत नसून सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला अनेकवार समान नागरीकायदा करणेबाबत सुचविलेले आहे. परंतु लांगूलचालन करणेकरीता राजकर्ते जाणूनबुजून या गोष्टीकडे दूर्लक्ष करत आहेत. हिंदू धर्माचे अस्तित्व टिकून राहण्याकरिता किमानपक्षी धर्मांतर बंदी कायदा झाला असता तर ख्रिश्चन आणि मुसलमान लोकांकडून आज जी धर्मांतरे होत आहेत ती झाली नसती. शासन काही करत नाही आणि वरील कम्युनिटी हिंदूंना स्वस्थ जगू देत नाहीत, मग धर्माचे रक्षण करण्याकरीता जे - जे हिंदू हे लोक बाटवत आहेत, त्या - त्या हिंदू कुटूंबियांना पुन:श्च शुद्ध करून घेवून या धर्मांध मंडळींना आवर घालायला नको का ?
आम्ही लाखो कुटूंबियांना पुन:श्च हिंदू धर्मात आणून ही शुद्धीकरणाची मोहिम हाती घेतल्याने ईसा‌ई मिशनरींच्या कार्याला काही प्रमाणात आळा बसत आहे. आमच्यासारखे शुद्धीकरणाचे कार्य आमचे शंकराचार्य आणि उर्वरित रामानंदाचार्य तसेच आमचे अन्य साधुसंत करू लागले तर आमचे बाटलेले हिंदू पुन:श्च हिंदू धर्मात सन्मानाने येवू शकतील. तुम्ही धर्माचे रक्षण केलेत तरच धर्म तुमचे रक्षण करतो.... धर्मामुळेच एकजूट हो‌ऊ शकते.... ऐक्यापुढे राजसत्ता ही दुबळी पडते. आज ज्या - ज्या धर्माचे ऐक्य आहे, त्या - त्या धर्मांचे लांगुन चालन करण्यासाठी राजसत्ता आसुसलेली आहे.... तुमचे देव, तुमची संस्कृती, तुमचे स्वतंत्र आचार - विचार अबाधित रहायला पाहिजे असतील तर धर्माचे रक्षण ही हिंदूधमयांसाठी काळाची गरज आहे.
आम्ही धर्मांध नाही, अन्यथा अन्य धर्मातील लोकांना हिंदू धर्माची दिक्षा देवून या धर्मात आणणे या हिंदू धर्माला अशक्य नाही. आम्ही सहिष्णुवादी असल्यामुळेच असा अविचार आमच्या मनाला शिवत नाही. आम्ही जरूर धर्माभिमानी आहोत.... आमच्या धर्माचे रक्षण करणे.... धर्माबद्दल जागरूकता निर्माण करणे.... हे आमचे आद्यकर्तव्य नव्हे का ? याचा अर्थच विश्वबंधुत्व नाकारणे असा होत नाही. विश्वबंधुत्वासाठी आम्ही तयार आहोत. परंतु जर कोणी जाणूनबुजून आमच्या बांधवांच्या आथक परिस्थितीचा, त्यांच्यामध्ये असलेल्या अज्ञानाचा फायदा उठवून धर्मांतरे करणार असेल तर त्याला जशास तसे उत्तर म्हणून शुद्धीकरण करणे हा माझा वज्रनिर्धार आहे.

Read more...

धर्मांध होवू नका, धर्माभिमानी व्हा!

20.12.09

वैदिक सनातन हिंदूधर्म की जय हो! असे म्हणणा-या हिंदूनो लक्षात घ्या, खरच आपली संस्कृती सनातन राहिली आहे का? या पृथ्वीच्या पाठीवर अनेक देशात आपली ही वैदिक सनातन संस्कृती नामशेष झाली तरीसुध्दा आम्ही या स्वप्नातून बाहेर यायला तयार नाही. जगात मुसलमान आणि ख्रिश्‍चन यांचे अनेक देश आहेत. तरीसुध्दा त्यांना या हिंदूस्थानामध्ये अल्पसंख्याक दर्जा मिळतो परंतु जगात हिंदूंचा एकही देश नाही. तरी या हिंदूला वाचविण्यासाठी कोणतेही शासन प्रयत्‍न करत नाही. या देशाला विकसीत करण्यासाठी हिंदूचे कुटूंबकल्याण करुन देशाची लोकसंख्या कंट्रोल करण्याचा सातत्याने प्रयत्‍न होत आहे. उत्तर पूर्व राज्य आणि दक्षिणेकडे काही राज्यांमध्ये हिंदू पूर्णत: अल्पसंख्याक झाला आहे. तरीही हिंदूनाच परीवार नियोजनाचे धडे दिले जातात. या देशात ख्रिश्‍चन मिशनरी दिवसागणिक हिंदूंचे धर्मांतर (कनव्हर्शन) करत आहेत, त्यांना ख्रिश्‍चन बनवित आहेत. त्यात कमी की काय.... त्यामुळे मुस्लिमांचे आता जेहादी लव्ह आक्रमक होवू लागले आहे. हिंदू मुलींना मुस्लीम मुलांनी प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह बंधनासाठी मुसलमान करायचे हे मोठ्या प्रमाणात संपूर्ण हिंदूस्थानात सुरु झाले आहे.
या देशातील हिंदूत्ववादी पक्ष सत्तेच्या लालसेपोटी हिंदूंची परखडपणे बाजू धरताना दिसत नाही. त्यामुळेच आज राममंदिराचा मुद्दा सतरा वर्षे होवून सुध्दा धुळ खात पडला आहे. समान नागरी कायदा देशाच्या स्थैर्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. परंतु हिंदूत्ववादी पक्ष प्रस्तुत मुद्दा ज्या ताकदीने उचलून धरला पाहिजे ते धरताना दिसत नाहीत.
वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करुन सेक्युलर पक्ष अन्य धर्मियांचे कोडकौतुक करत आहे. या‌उलट हिंदूत्ववादी पक्ष आतून त्यांच्या अजेंड्याला मुकसंमती देत आहेत. राजाश्रय नसेल तर तुमचा धर्म टिकणार कसा? याकरीता हिंदूनी अन्य धर्मियांकडून शिका. ते कोणत्याच राजकीय पक्षाला बांधील नसतात. जो आमच्या धर्माचा सन्मान राखेल तो उमेदवार आमचा अशी भुमिका तुम्ही का घेवू शकत नाही? धर्मगुरु या नात्याने आम्ही आपल्याला आवाहन करत आहोत उठा, जागे व्हा! आपला धर्म, आपली संस्कृती, आपले न्याय-हक्क अबाधित रहायचे असतील तर तुम्हीही अशी मोहिम राबवा की, जो उमेदवार आमच्या हिंदूंची बाजू मांडेल, नव्हे... नव्हे... उचलून धरेल असाच उमेदवार आमच्यावर राज्य करेल. आम्ही त्याची जात, धर्म, पक्ष पहाणार नाही. आमच्या धर्माच्या आवाहनाप्रमाणे वागू आणि धर्माचे रक्षण करु.
जर तुम्ही आमचे ऐकले नाहीत तर एक दिवस असा उगवेल की आपली नावे...... आपला धर्म बदलून आपल्याला बाटग्याचे जीवन जगण्याची नामुष्की ये‌ईल. फक्त आपल्यालाच नाही..... तर आपली सर्व वंशवेल बाटगी हो‌ईल. खरच तुम्हाला धर्माचा स्वाभिमान आहे का? असेल तर हा आमचा संदेश अनेकांना सांगा. तुम्ही करा आणि दुस-याला करायला लावा. रक्त हिंदूचे असेल तर स्वाभिमानी व्हा!

Read more...